मिरारोड मध्ये दारूच्या दुकानात चोरीचा  प्रयत्न ठाणे तुफान मीरारोड पूर्व : 

मिरारोड मध्ये दारूच्या दुकानात चोरीचा  प्रयत्न


तठाणे तुफान मिरारोड पूर्व : 


  कोरोनामुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाउन च्या काळात चोरीच्या,दरोडे,अपघात,मारामारी या अन्य स्वरूपाच्या घटनाचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे. हे सत्य असलेतरीही नशेच्या पदार्थांची विक्री चोरीच्या मार्गाने सुरू आहे.  नशेच्या वस्तुंचा  काळाबाजार वाढलेला आहे तीन ते चार पटीने किंमत घेऊन नशेच्या वस्तूंची विक्री केली जात आहे. नशेची लत लागलेले ही किंमत मोजूनही चोरीच्या मार्गाने खरेदी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली दुचाकी चारचाकी वरून फिरतांना दिसत आहेत.


देशातील संचारबंदीचे  दिवस जसजसे जात आहेत तसतसे  नशेची लत लागलेल्या नागरिकांची घालमेल सुरू आहे काल मिरारोड मध्ये मीरा-भाईंदर मार्गावरील एडन बेकरी च्या चौकात असलेले हाटकेश सिग्नलचे  ब्लू बर्ड वाईन दुकानाच्या शटरचा पत्रा तोडून नशेची पदार्थ चोरट्यांनी  चोरण्याचा प्रयत्न केल्याचची धक्कादायक बाब समोर आली आहे. मीरा-भाईंदर चा हा रस्ता नेहमी रहदारीचा असल्याने चोरीचा प्रयत्न फसला असावा असे अनेकांना वाटते आहे.
हे दारूचे दुकान फोडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे की, नशाखोर हे स्पष्ट नसले तरीही अनेकांना असे वाटते आहे की, नशेची लत लागलेल्या व्यक्तींनीच हा प्रकार केला असावा कारण नशा ही माणसाला कोणत्याही थराला नेत असते.



विशेष म्हणजे याबाबत काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही अफवा असून अशी काहीच घटना घडली नसल्याचे सांगितले. तर सदर दुकान चालक उदय कोठारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते म्हणाले की, चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे पण कोणतेही समान चोरीला गेलें नाही.याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे असेही या दुकान चालकाने सांगितले.
         ठाणे जिल्ह्यात 20 मार्च पासून मद्य विक्री बंद करण्यात आली आहे .दारुच्या आधीन गेलेल्यामध्यपीना दारू भेटत नसल्याने काही ठिकाणी दरात वाढ करुण छुप्यामार्गाने  दारूची विक्री चोरी छुप्या मार्गाने केली जात होती.संचार बंदी असूनही काही मद्यपि दारू खरेदी करता घरा बाहेर पडत होते.मात्र पोलिसांच्या कड़क बंदोबस्त व वाढलेले दारुचे भाव या मुळे त्याना चोरिचा मार्ग स्विकारावा लागला. असल्याची चर्चा सुरू आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री मीरा-भाईंदर मार्गावरील हटकेश नाक्यावर असलेल्या ब्लू बर्ड वाईन या दुकानाच्या शटरचा पत्रा तोडून चोरट्यांनी मद्यसाठा चोरण्याचा प्रयत्न केला असून स्थानिक काशिमीरा  पोलिसांना या बाबत काहीही माहिती नव्हते. मात्र प्रत्यक्ष  घटनास्थळी जाताच दुकानाच्या शटरचा पत्रा वाकविल्याचे स्पष्टपणे दिसून आले. याठिकाणी काही वेळाने पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याचे समजत आहे