औषधांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना मीरारोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या आहेत.
पैसे कमावण्यासाठी कोणत्याही प्रकारची जोखीम उचलण्याची मानसिकता बनवून काही प्रवृत्ती काळाबाजार करतात एकीकडे कोरोनाच्या साथीचा काळ सुरू आहे.तर त्या रुग्णांना रुग्णालयातून विविध इंजेक्शन आणि गोळ्या बाहेरून आणण्यासाठी सांगितले जाते. त्यामध्ये रेमडीसिवर १०० एमजी हे इंजेक्शन औषधाचा वापर केला जातो. काळाबाजार करून काळी कमाई करू पाहणारे दोघानां जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
देशातली जनता सरकारच्या नियोजनामुळे अगोदरच त्रस्त आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि उपचारासाठी लागणारी अपुरी साधन सामुग्री, त्यात रुग्णांवर उपचारादरम्यान देण्यात येत असलेले औषध म्हणून वापर केला जात असलेले रेमडीसिवर इंजेक्शन याचा काळाबाजार करून पैसे कमावणारे दोन जण पोलिसांच्या हाताला लागले आहेत. हे औषध बाजारात उपलब्ध झाले आहे. मात्र, या इंजेक्शनचा गैर फायदा घेऊन तेच काळाबाजारात विकून किमतीपेक्षा अधिक रुपयांना विकणे सुरू आहे. काळ्याबाजारात बाजार भावापेक्षा दुप्पट भावाने हे इंजेक्शन विकले जात असल्याची माहिती मिरारोड पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघानां गजाआड केले. त्यांच्याकडून मुद्देमाल ही हस्तगत केला आहे.
मिरारोड मधिल साईबाबा नगर येथे शुक्रवारी सायंकाळी दोन व्यक्ती रेमडीसिवर इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, मिरारोड पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनास कळवून त्यांची मदत घेत सापळा लावला. रेमडीसिवर १०० एमजी हे औषध विक्री करणारे दोनजण अलगद मिरारोड पोलिसाच्या सापळ्यात अकडले. या वेळी त्यांच्या कडे २१ हजार ६०० रुपये किमतीचे रेमडीसिवर १०० एमजी इंजेक्शन नावाचे औषध जप्त करण्यात आले आहे. हे औषध बाजारात उपलब्ध आहे. मात्र, काही विकृतीनी काळाबाजार सुरू केल्याने नाहक पणे गरजेपेक्षा जास्त किंमत नागरिकांना मोजावी लागत आहे. कोरोनाच्या संक्रमित झालेल्या रुग्णांना ईतर काही औषधा बरोबर हे इंजेक्शन दिले जाते. अनेक हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन आणि गोळ्यां ह्या रुग्णाच्या नातेवाईकांना आणण्यास सांगितल्या जातात . त्यामध्ये रेमडीसिवर १०० एमजी या इंजेक्शनचाही समावेश असतो त्याच औषधाचा काळाबाजार सुरू असल्याने नागरीक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
सपना घुणकीकर यांनी या संदर्भात तक्रार नोंद केली असून पोलीसांनी आरोपीला गजाआड केले आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कदम करत आहे.