संचारबंदीत तबेल्यातील दुधाच्या विक्रीला फटका
(ठाणे तुफान)मिरारोड पूर्व :
कोरोना संसर्गाच्या साथीचा फटका जवळजवळ सर्वच व्यवसायांना बसला आहे. अनेक छोटे छोटे व्यावसायिकांचे कुटुंब त्यांच्या व्यवसायावर अवलंबून आहे. पण देशात सुरू असलेली संचारबंदी आणि लॉकडाउन मुळे त्यांचे आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. अशा परिस्थितीत खायचे काय असा प्रश्न विचारला जात आहे. तर जे व्यवसाय सुरू आहेत त्यांच्या व्यवसायालाही या संचारबंदीचा फटका बसला आहे असे मत दूध विक्रेते सांगत आहेत.
पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर शहरात तबल्याचे दूध विक्री कमी झाली आहे. कोरोनाच्या भीतीने अनेक संकुलनातील नागरिकांनी दूध घेणे बंद केले आहे. पिशवीतील दूध वापरले जात आहे. त्यामुळे अतिरिक्त दूध साठ्यात मात्र वाढ होत आहे .परिणामी दूध शिल्लक राहत असल्याने दुध विक्रेत्यांसह तबेला व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ निर्माण होतांना दिसत आहे .
शहरात तबल्याचे दूध विक्री करणारे अनेक तबेले आहेत. तबेले धारकाच्या बरोबरच, किरकोळ दूध विक्रेत्यांची संख्या जास्त आहे .संचारबंदी लागू केल्यानंतर घराबाहेर येऊन गर्दी करू नये यासाठी भाजी, किराणा, दूध इत्यादी जिवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. पण काही नागरिकांनी कोरोनाच्या भीतीमुळे दूध घेणे बंद केले आहे. दुधाची मागणी घटल्याने तबेला व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे .संचारबंदी लागू झाल्यानंतर नागरिक घराबाहेर पडत नसल्याने घरपोच पॅकिंग दूध सेवा करण्यासाठी नागरिकांची मागणी होत आहे. पण या सेवेसाठी तबेलावाल्यांना पुरेसे मनुष्यबळ, साधनसामग्री उपलब्ध होत नसल्याने तबेला व्यावसायिकांचे ३०% टक्के पेक्षा अधिक दूध शिल्लक राहत आहे .दररोज दोन हजारां पेक्षा अधिक लिटर दूध तबेल्यामध्ये तयार होते, आता मात्र दुधाची मागणी घटल्याने तबेला व्यावसायिक तूप निर्मिती करत आहेत .काही दूध संघांनी देखील दुधाची मागणी घटल्याने दुधापासून पावडर निमिर्ती वर जोर दिला आहे .तर किरकोळ दूध विक्रेत्याकडील दुधाची मागणी सुद्धा घटली आहे .
प्रतिक्रिया
करोनामुळे नागरिक तबेल्यात दूध घेण्यासाठी येत नसल्याने दुधाच्या मागणीत घाट झाली आहे . नागरिकांना दररोज तबेल्याचे ताजे दूध मिळावे यासाठी आम्ही घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत .
भरत भारवड - तबेला व्यावसायिक